शाळेत असतांना झालेलं पहिला attraction , ते नजर चोरणं, चुकून पुन्हा नजर एकमेकांनाच भिडण, कुणालाच कळू नये असं वागणं, कुणाच तरी या गोष्टीला प्रोत्साहन आणि सगळी गम्मत मज्जा. मला हा सिनेमा पाहतांना माझे शाळेचे दिवस आठवले आणि या थोड्याच वेळात मी ते दिवस पुन्हा जगले. ह्या सिनेमाला पिफ मध्ये इतके awards मिळणं साहजिकच होतं. Direction , cinematography , music सगळच amazing . पण हे यश अभिनयाच्या शिवाय शक्यच न्हवत. सगळ्यांनीच अभिनय खूप उत्कृष्ट केलं आहे. अंशुमन आणि केतकीला तर खरच hats off. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजय दहाकेयांनी केलं असून हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शनाचा यशस्वी प्रयत्न. हा सिनेमा विवेक वाघ आणि निलेश नवलखा यांनी निर्मित केला आहे. तर यात दिलीप प्रभावळकर, नंदू माधव, देविका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, अंशुमन जोशी आणि केतकी मातेगावकर या कलाकारांनी काम केला आहे.
पहिल्या प्रेमाची आठवण आणि तिची मजा पुन्हा एकदा लुटायची असेल तर हा सिनेमा नक्की पहा. मी ह्याचा दोनदा अनुभव घेतला, तुम्ही कमीत कमी एकदा तरी पहा आणि शाळेतलं आयुष्य वापस एकदा जगा.
by Renuka Behere.
No comments:
Post a Comment