Saturday, 3 December 2011

Adgul Madgul



प्रत्येक वेळेला रंगांचे सन्दर्भ बदलत असतात. जसे विषय बदलतील तसे.  काळ्या रंगाच  पण तसेच आहे..लोकांना डोक्यावरचे केस पांढरे झाले तर ते चालत नाहीत, त्याला रंगवून काळे  केले जातात, पण तेच जर स्किन कलर विषयी असेल तर आपली दृष्टी बदलते... अडगुल  मडगुल हा चित्रपट हाच विषय खुप उत्तम सादरीकरणातून  आपल्यासमोर मांडतो..

परांजपे आणी पेंडसे एकमेकांचे व्याही..सगळेच  गोरे या सदरात मोडणारे , रीती प्रमाणे  प्रेमात पडून अनु आणी शांतनु चे लग्न होते....
 अनु ला दिवस जातात त्यावेळी तिचं खुप कोड कौतुक होत....खुपच आनंदाचं वातावरण !!!!  पण, तीला मुलगा होतो आणी सगळं चित्रच पालटून जात..कारण  तो असतो संपूर्ण पणे  काळा  कुट्ट.. मग सुरु होते विश्वासाची परीक्षा..
 जे संदर्भ लग्नाआधी खुप सहज आलेले असतात, त्यातच शांतनु काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत राहतो...अनुची घुसमट  होत रहते..घरात कुणीच मुलाला अपलेसे करत नाहीत..एका काळ्या  रंगामुले खुप गोष्टी घडत राहतात..

गोष्ट छोटी डोंगरा एवढी,गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सारखे अत्यंत contemopary विषय लीलया हाताळल्या नंतर नागेश भोसले अरविंद जगताप या लेखक दिग्दर्शक द्वयीने एक  गंभीर असु शकणारा विषय    अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने मंडला आहे..चित्रपटाचा दूसरा भाग लक्षवेधी झाला आहे..प्रेक्षकाला विचारही करायला लावेल आणि  विचार बदलायलाही लावेल असा या चित्रपटाचा विषय आहे..मांडणी उत्तम जमली आहे..

सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका चोख केल्या आहेत..विशेष उल्लेख करावा तो स्मिता तळवळकर यांचा, ती भूमिका त्यानीच करावी अशी त्यानी वठाली आहे. लेखक म्हणून यश मिळवल्या नंतर अरविंद जगताप यांचा अभिनेता म्हणून पडद्या वरचा वावर त्यांच्या लेखन इतकाच रेफ्रेशिंग आहे ..अधून मधून प्रयोग म्हणून त्यानी अभिनय  करायला  हरकत नाही...सुबोध भावे ला बालगंधर्वांची  ची प्रतिमा पुसायला यानिमित्ताने चांगलीच मदतच झाली आहे..गिरिजा, अनीता, नागेश भोसले सगळ्यांचं कामही छानच आहे..

एकदा जाउन  अवश्य पहावा असाच हा नवीन विषयाचा वेध घेणारा चित्रपट आहे...

1 comment:

  1. a black topic handled very carefully... i saw it... its good... very interesting concept...

    ReplyDelete