खरं सांगायचं झालं तर आगदी योग्य म्हंटल जातं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मध्ये खूप कमी अंतर आहे. श्रद्धेने प्रोत्साहन मिळतं पण अंधश्रद्धा मुळे मात्र नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते. आजच्या so called modern जगात, कुठे तरी जगाच्या कोपर्यात, जिथे शिक्षणाची पोच नाही तिथे आजही हे आसे हृदय हेलावून टाकणारेप्रकार घडतात, फरक इतकाच की आपण त्या साऱ्या पासून खूप दूर आहोत. आसाच खूप हलवा आणि भावनिक विषय "देउळ" हा चित्रपट मांडतो. एका भोळ्या भाबड्या माणसाला कसे दत्तं भगवान दिसतात आणि त्या गोष्टीचा कसा बोभाटा होऊन राजकारणी लोक कसे याचा फायदा घेतात ह्याची मांडणी खूपच उत्कृष्टपणे केली आहे. Technically perfect. Cinematography , editing . dialogues , characterization excellent.
प्रत्येक कलाकाराने अप्रतिम काम केले आहे. गिरीश कुलकर्णीन बद्दल तर काही बोलायलाच नोको. जीव ओतून काम करणं काय असतं हे लगेच कळतं. नाना पाटेकर यांना ताकदीची टक्कर दिली ते दिलीप प्रभावळकरांनी. नानांचे exprations क्या बात हैं!! प्रभावळकरांनी केलेली जवाबदारीची भूमिका तर एक नंबर. आणि प्रेक्षकांचे डोळे दिपले ते नसरुद्दिन शाह यांना पाहून.
एकंदरीत अप्रतिम कलाकृती आणि मराठी माणसाने एकदा तरी पाहावा असा हा सिनेमा.
a must watch film... exceptional marathi film... watch it friends... dont miss it...
ReplyDelete