Sunday, 11 December 2011


प्रतिबिंब 

'स्मित मूव्ही' या banner अंतर्गत प्रशांत हिरे निर्मित  'प्रतिबिंब' हा चित्रपट या ९ तारखेला प्रदर्शित झाला.मानवी नातेसंबंधांची गूढता, त्याचा शोध घेताना वाढणारी गुंतागुंत आणि व्यक्तिरेखांचा एकमेकांशी भावबंध म्हणजेच 'प्रतिबिंब'.

गिरीश मोहिते यांच दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटातून संपदा हिरे हिने पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. कथा संवाद अनिरुद्ध पोतदार आणि अभय दाखने याचं असून संगीत अवधूत गुप्तेच आहे. चित्रपटांच छायाचित्रीकरण संतोष शिंदे यांचं आहे. 

ही कथा नव विवाहित दाम्पत्य जयसिंगराजे आणि गौरी यांची आहे. जयच्या घरात प्रवेशताच ती तिच्यासारख्याच दिसणाऱ्या बाईचा फोटो पाहून चकित होते. तिला कळतं की तो जयच्या मृत पहिल्या बायकोचा, वासुमातीचा फोटो आहे. गौरीला वासुमातीचे प्रतिबिंब म्हणून जगण्याचा त्रास होऊ लागतो. आणि वसुमती गौरीच्या रुपात त्याच्या आयुष्यात परतली आहे हा जयचा विश्वास. नवऱ्याच प्रेम आणि घरच्यांचा आधार असतांना गौरीच्या आयुष्यात अचानक चमत्कारी आणि भयावः घटना घडू लागतात. एका पाठी एक संशयास्पद घडणारे मृत्यू आणि या मगच गूढ रहस्य वाढत चालले असते. 

या   सगळ्या मागे कोण असतं हे फार मनोरंजक पद्धतीने दर्शवले आहे. अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, रवींद्र मंकणी, गणेश यादव आणि बाकी सगळ्याच कलाकारांनी आपापली भूमिका चोख निभावली. असं रहस्यमय आणि कधी कधी भ्यायला लावणारा चित्रपट बनवण्याचा हा एक चांगला प्रयत्न होता.

1 comment:

  1. interesting... mhanje vachun tari utsukta vatti ahe.... marathi cinema madhe content khoop attractive yayla laglet... ho na??

    ReplyDelete